अत्ताच "डोंबिवली फास्ट" बघितला. मनामधे एक वादळ उधळलं. तो चित्रपट कसा आहे हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच नव्हे. तो चित्रपट बघताना काही प्रश्न मनांत उभे राहीले. कल्पना आहे की सर्वच प्रश्नांना उत्तरं नसतात. पण परिक्षेतला अख्खाच्या अख्खा पेपर कोरा द्यावा? माधव आपटे शेवटी एक शून्यच व्हावा? का म्हणून?
खरंतर आपण सगळेच माधव आपटे आहोत. शक्यतो सरळ मार्गाने सामान्य जीवन जगण्याचा आपल्या सर्वांचाच प्रयत्न असतो. नियम पाळावे अशी आपल्या सर्वांचीच ईच्छा असते. पण त्या इच्छेला प्रत्यक्षात आणायचं कुणी? त्या माधव आपटेने?
का आपण असं बुळ्यासारखं सहन करत जगायचं? सिग्नल तोडला म्हणून भरायला लागणार्या पाचशे रुपये दंडातले साडेचारशे रुपये वाचावेत म्हणून? का सगळेच नियम तोडतात, आम्ही एकटे काय जग बदलणार म्हणून?
मी बोललो कोणाविरुद्ध तर मलच मुस्काटात पडेल म्हणून शेपूट घालून आपण गप्प बसायचं? किती दिवस? ह्यापेक्षा किडे मुंग्यांचं आयुष्य बरं. आपल्याकडे ह्यावर एक रामबाण उत्तर आहे. सगळी system च सडलेली आहे असं म्हणायचं आणि आपण स्वतः त्या system चा एक अविभाज्य घटक बनत जायचं. कधी लाच देताना, तर कधी लाच घेताना. कधी सिग्नल तोडताना तर कधी जास्त पॆसे देवून licence बनवून घेताना.
कोणाची बनली आहे ही system? चंद्रावरचे का मंगळावरचे लोकं बनवतात आणि चालवतात ही system? तुम्ही आम्हीच बनलोय ना ह्या system ची चाकं, रस्ते, इंजिन आणि इंधन? मग का नाही आपण सगळे मिळून ही system सुधरवू शकत? का नाही आपण एका नागरिकाची कर्तव्य पार पाडू शकत. सगळा दोष इतरांवर तरी का मारायचा? उद्या इतरांनी express tower मधून उडी मारली, आपण मारू?
किती संवेदनाशून्य बनत चाललो आहोत आपण? माझं काम झालं नं, दुनिया गई भाड मे असं आपलं का व्हावं? आपण आपल्या समाजाचे, देशाचं काही देणं लागतो असा विचार का नाही येत आपल्या मनामधे. कायदा वाकवून केलेली कामं एका माणसाचा फायदा करून देतील, पण त्यमुळे इतर अनेकांचं नुकसान होईल हा विचार कोणी करायचा? तुम्ही मी म्हणू, की आम्ही काहीच बेकायदेशीर काम करत नाही. पण अरे दुसरा बेकायदेशीर काम करत असताना आपण त्याकडे काणाडोळा करणं चूक नाही का? कोण भांडणार आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी? माधव आपटे?
जावूदे तुम्ही आम्ही तरी काय, भावनेच्या भरात मी काहीतरी खरडणार, तुम्ही ते वाचणार आणि घरातल्या सुरक्षित वतावरणात शेपूट घालून बसणार. शेवटी माधव आपटे एक शून्यच रहाणार. एक भलं मोठं शून्य. ना आपल्यासाठी त्याची धन बाजू ना ऋण. ना त्याच्यामुळे आपली total वाढणार ना कमी होणार. कोणी झालाच माधव आपटे तर त्याच्यासाठी आपण एक सुस्कारा टाकणार आणि त्याला एक शून्य ठरवून आपापल्या कामांना लागणार.......
Saturday, January 27, 2007
Tuesday, January 23, 2007
रडुबाई....
एक मुलगा होता. सगळ्याच मुलांसारखा तो एक साधासुधा मुलगा. लहान होता, तेव्हा त्याचे गोरे गोरे गाल टॉमॅटोसारखे लाल लाल होत. त्याच्या आजुबाजुची मोठी मोठी माण्से मग आपला मोठेपणा सोडून देत आणि त्याला त्याच्या गालांचे टॉमॅटो मागीत. त्याला वाटे की खरंच कोणी आपल्या गालांचे टॉमॅटो घरी नेवून आमटीत टाकले तर? ह्या विचारानेच तो घाबरा घुबरा होई आणि रडंत रडंत धुम ठोके. लहान झालेले मोठे आपापल्या कामाला लागले, की तो हळूच जावून आरशात पाही आणि गालांची लाली शाबूत असल्याची खात्री करून घेई. मगच त्याचा जीव भांड्यात पडे.
जशी सगळी लहान मुलं जातात तसा तोही शी-शू वर्गात जाई. त्याच्या बाई त्याला खूप आवडत आणि त्यांचाही तो अतिशय लाडका होता. त्याल त्या रडुबाई म्हणत आणि आपला हा हिरो बाईंनी दिलेल्या नावाला नक्की जागत असे. दुसर्या बाई वर्गावर आल्या की ह्याने भोकाड पसरलेच म्हणून समजा.
पण तसा हा आपला रडुबाई लबाडही होता. रोजच्या अभ्यासात पाटीवर काढायचे पाढे तो पंधरा दिवसांतून एकदाच काढत असे. पाटीवरची तारीख बदलली की झाले ह्याचे काम.
आपला हा "रडुबाई" मुळातच उत्सवप्रीय. गणपती आले म्हणजे त्याचा आनंद गगनात मावेनसा होई. दहा दिवस नुसता आनंदसोहळा असे. मग कधीतरी हा सांस्कृतिक कार्यक्रमातही भाग घेई. स्टेजवर गेल्यावर त्याचे हात-पाय लटपटंत. मग हा १० मिनिटांत करायचा कार्यक्रम दोनच मिनिटांत संपवे आणि स्टेजवरून धुम ठोके.
त्याला माहित असे की आपला कार्यक्र्म चांगला नाही झाला. तरीदेखील त्यला वाटे की आपल्याला बक्षिस मिळेल. मग उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बक्षिस समारंभ संपेपर्यंत तो त्याचं नाव घेतलं जण्याची वाट पाही. त्याला ते बक्षिस हवं असे, कारण त्याच्या मित्रांना कोणतं ना कोणतं बक्षिस मिळालेलं असे. त्याला वाईट वाटे, रडू येई. पण ते कुणालाही न जाणवू देता, हा कुठेतरी धुम ठोके.
थोड्या वेळानी गणपती बप्पा निघायची वेळ होई. उत्तरपूजा झाल्यावर कोणीतरी जाणता देवाला साकडं घाली की सर्वांच्या ईच्छा पूर्ण होवूदेत म्हणून. सगळीकडे गंभीर शांतता पसरून राही. आपल्या ह्या रडुबाईच्या डोळ्यात टचकन पाणी येई. मांडवाची आवराआवर तो दुरूनच पहात राही. मखरात नसलेली गणपतीची मूर्तीमात्र त्याला अस्वस्थ करून सोडी. मग तो नेहमीप्रमाणेच तिथुन धुम ठोके.
असा हा रडुबाई लहानाचा मोठा कधी झाला ते इतरांनाच काय पण त्यालासुद्धा कळलं नाही. आणि एक दिवस त्याला नोकरीसाठी परदेशी जायची वेळ आली. रडुबाईच नाही तर त्याच्या घरातली सर्वजण हरखून गेली. जाण्याचा दिवस आला. रडुबाई आता मोठा झाला असल्याने रडू शकला नही. घरातून निघता निघता आईच्या डोळ्यातलं पाणी त्याला बघवलं नाही. पण तरीसुद्धा तो निर्धाराने रडला नही. बाबांनी त्याला नीट रहा, एकटाच जातोयस तेव्हा काळजी घे असं सांगितलं तरीपण तो रडला नाही. बहिणीला समजावता समजावता त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने ते अश्रू निर्धाराने थोपवून धरले.
परदेशी पोचल्यावर तो मात्र ओक्साबोक्शी रडला. गाल खेचणारे शेजारी, बाई, गणपती बप्पा, आई, बाबा, बहीण सगळे सगळे त्याला अजूनही आठवतात आणि तोही त्यांना आठवून मनातल्या मनातच रडतो. आता तो मोठा झालाय ना? मग तो कधीकधी आपल्या आठवणी लिहून काढतो. लिहिता लिहिता डोळे कधी भरून येतात त्याचं त्यालपण समजंत नाही. धुरकट डोळ्यांत त्याला लहानगा रडुबाई दिसू लागतो......

आपला,
कोहम
8
देवाणघेवाणी
Monday, December 04, 2006
पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा....
आज इथे खूप पाऊस पडतोय. का कुणास ठावूक पण पावसाने माझ्या मनातला एक कोपरा अलगद ओला करून ठेवलाय. माणसाचा अनूभव आपण त्याने बघितलेल्या पावसाळ्यांत मोजतो. मी मात्र आयुष्याच्या अनुभवांमधे हरवलेले पावसाळे शोधतो. कधी ते सापडतायत असं वटतं तर कधी त्यांचा अजिबात थांग लागत नाही. धो धो आला की आपल्याला चिंब करून सोडतो, त्याचा अनुभव त्या एका क्षणापुरता. तो आपण साठवून ठेवू शकत नाही. साठवून ठेवायचा प्रयत्न केला की मग त्याचं पाणी होतं, तो पाऊस रहात नाही. आणि मग आपण त्यला जुन्या आठवणींतच शोधायला लागतो.
धो धो पाऊस कोसळतोय, मी शाळेतून घरी येतोय. हातात छत्री आहे पण ती वार्याने उडतेय. मी रस्त्याबाजूच्या दुकानाच्या शेडमधे थांबतो. दप्तरातून लपवून आणलेली मोठ्ठी प्लास्टिक ची पिशवी काढतो. त्या पिशवीत दप्तर सरकवतो. पाठीवरचं दप्तर प्लास्टिकच्या पिशवीत लपतं आणि माझ्या हातात येतं. मी छत्री बंद करून खुशाल शेडबाहेर येतो. दप्तरातली पुस्तकं माझ्या हुशारीला दाद देत असतात. मी पावसात मनसोक्त भिजतो. रस्त्यात साठलेलं पाणी खुशाल माझ्या गमबुटांमधे जावू देतो. शक्य झालं तर साठलेल्या पाण्यात उडी मारण्याचा आनंद घेतो. त्या गमबुटांत साठलेल्या पाण्याने मनातला एक कोपरा कायमचा भारून जातो. घर जवळ येतं तस प्लस्टिकच्या पिशवीतलं दप्तर हळूच बाहेर येतं. पिशवी कचर्याच्या टोपलीत जाते आणि वारा खूप असल्याने भिजल्याचं कारण आजीला सांगितलं जातं. आजच्यासारखा कधी पाऊस आला की पावसाबरोबर ते दप्तर, ती पुस्तकं, ती छत्री आणि आजीसुद्धा खूप खूप मागे रहिल्याचं जाणवतं
दर आठवड्यात यावा तसा ह्या आठवड्यातही रविवार येतो. रविवार म्हंटला की संध्याकाळी क्रिकेट खेळायचा कार्यक्रम ठरलेला असतो. नेहमी हवाहवासा वाटणारा पऊस रविवारी मात्र नकोसा झालेला असतो. एकदा का अंगण ओलं झालं की संध्याकाळपर्यंत ते नक्कीच वाळणार नसतं. मी दर पंधरा मिनिटांनी बाहेर येवून ढगांकडे पहात असतो. हे माझंच नाही तर सगळ्याच मुलांचं चाललेलं असतं. खेळाची वेळ जवळ येते तसं मनाला बरं वाटायला लागतं. आता पाऊस येणार नाही ह्याची हळूहळू खात्री पटू लागते, आणि अचानक सरींवर सरी कोसळू लगतात. पावसावर सगळी मुलं कावतात, बिचारा पऊस आमच्यासठी थांबतो. तशाच ओल्या अंगणात काही उत्साही मुलं क्रिकेट सुरू करतात, टेनिसचा चेंडू अवघा पाऊस स्वतःमधे साठवतो. मी तो जोरदार फटकावतो आणि तो सरळ सान्यांच्या घरात जातो. विळीवर दोन तुकडे झालेला चेंडू घेऊन साने आणि चाळीतली मुलं तेव्हा थांबलेला खेळ आता मझ्या मनात सुरू करतात.
नवरात्रातले धामधुमीचे दिवस असतात. संध्याकाळी सर्वांना रात्री होवू घातलेल्य नाटकाची चाहूल लागलेली असते. हॊशी कलाकारांना कार्यक्रमाचा ताण आलेला असतो. मनातल्या मनात संवादांची उजळणी चालू असते. अचानक आभाळ लाल होवू लागतं. चाळीतला कुणी जाणता सर्वांना सांगतो, हे ढग तर पावसाचेच. मग ह्या पावसाला कसंतरी कटवण्यासाठी मखरातल्या देवीच्या विनवण्या केल्या जातात. बर्याचदा पाऊस शहाण्या मुलासारखा आल्यापावली परततो. मखरातल्या देवीला नारळ वाहीला जातो. तेव्हाच्या त्या नाटकाचा पडदा अलगद अत्ता माझ्या मनात वर जावू लागतो. स्टेजवरच्या पत्रांमध्ये मी स्वतःला शोधत रहातो.
पंधरा ऑगस्टचा दिवस असतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त, पाऊस धो धो कोसळत असतो. मी भीमाशंकराच्या डोंगराला भिडलेला असतो. गणेश घाटाची वाट सोपी पण न संपणारी म्हणून शिडी घाटाची चटचट पोहोचणारी वाट पकडलेली असते. हाताने एका मोठ्या दगडाचा आधार घेतलेला असतो. पाय खालच्या वाटेला घट्ट धरून असतात. कानांमध्ये तुफ़ान वारा घोंघावत असतो आणि पावसाच्या धारा मला झोडपून काढत असतात. वार्यावर स्वार होवून आलेल्या पावसाचे धपाटे खावून असं वाटतं की ह्या क्षणी जर आपण इथे न येता घरी थांबलो असतो, तर किती बरं झालं असतं. आज मन असा कोणताही विचार न करता सरसर सह्याद्री चाढू लागतं.
मी आणि ती समुद्र्किनारी फिरत असतो. न बोलावून्सुद्धा पाऊस माझ्या मदतीला धावून येतो. अर्थातच आमच्या दोघांकडे एकच छत्री असते. एका छत्रीतून दोन जणांनी जाण्याची एरवी नकोशी वाटणारी कसरत हवीहवीशी वाटायला लागते. मरीन लाइन्सच्या कट्ट्यावर लाटा जोरजोरात आपटत असतात. हातात गरमागरम कणीस असतं आणि त्याला लावलेल्या मसाल्यापेक्षासुद्ध लज्जतदार असा तिचा चोरटा स्पर्श असतो.
विचार करता करता पाऊस थांबून उन्हं कधी पसरली कळलंच नाही. पावसाची साठवण करता येत नसली तरी आठवण आपण मात्र नक्कीच करू शकतो.

3
देवाणघेवाणी
Sunday, October 15, 2006
क्षितीज आणि घर.....
क्षितिजाला पकडण्यासाठी, मी धाव धाव धावलो
मुक्काम तर आलाच नाही, पण घरही हरवून बसलो
दमलो भागलो थकलो, पण तरीही नाही थांबलो
अनेक गावं, अनेक रस्ते, तुडवतंच मी रहिलो
मनात एकदा विचार आला, कशासाठी धावलो?
धावून धावून शेवटी मी जिंकलो का हरलो?
एकच क्षण विचार करत, होतो तिथे थांबलो
दुसर्या क्षणी मत्र, पुन्हा जीवाच्या आकांताने धावलो
क्षितीज मिळत नाही म्हणून, कुणी धावायचं थांबतं का?
घर मागे राहिलं म्हणून कोणी थांबायचं म्हणतं का?
मी परतलो नाही म्हणून, घर माझं रडलं.
मझ्याकडे पहून मात्र क्षितीज छद्मी हसलं.

Sunday, October 08, 2006
ढेकूण आणि कावळे...
एक आटपाट नगर होतं. त्या नगरात सर्वकाही होतं. चांगली कसदार जमीन, भरपूर पाणी, नद्या, निसर्ग. पण तरीही आटपाट नगरात सूख काय ते नव्हतं. नगरातली सर्व माणसं ढेकणांनी त्रस्त झलेली होती. जिथं पहावं तिथं ढेकूण, आणि साधेसुधे ढेकूणही नाहीत. एकदंम चिवट, त्रासदायक ढेकूण. नुसतं पाच मिनटं स्वस्थ बसावं तर ह्यांचा उपद्रव सुरू. खाकी ढेकूण, हिरवे ढेकूण, भगवे ढेकूण, तिरंगी ढेकूण, देशी ढेकूण, विदेशी ढेकूण सर्वांनीच अगदी त्या नगरातल्या व्यक्ती हॆराण झाल्या होत्या.
आम्हीपण त्या आटपाट नगराचे रहिवाशी होतो. सर्वांप्रमाणेच आम्हालाही ढेकणांनी छळलं होतं. बरेचसे लोकं ह्या ढेकणांचा त्रास नको म्हणून दूर दूरच्या अधिक आटपाट नगरांत जावून राहू लागले. मधेमधे ते लोक आमच्या नगरातील लोकांना पत्रे पाठवीत. त्यात न चुकता ते आपले अनुभव कळवीत. काही जण लिहीत की आमच्या नगरांत ढेकूणंच नाहीत, त्यामुळे आमचं आयुष्य सुखाचं झालं आहे. काही जण लिहीत की आमच्या नगरांत ढेकूण आहेत पण कमी चवतात. काही अतिआटपाट नगरांत म्हणे, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन किंवा हुजूर किंवा मजूर जातीचे ढेकूण होते. ते म्हणे आलटून पालटून त्या त्या अतिआटपाट नगरांतील लोकांना सतावत असत. पण त्यांनादेखील आमच्या आटपाट नगरातील ढेकणांची सर नव्हती.
आम्हीदेखील ह्या निरनिराळ्या प्रकारच्या ढेकणांना कंटाळलो होतो. म्हणून आम्हीदेखील ठरवलं की पहुया दुसर्या नगरांत जावून कसं काय वाटतं ते. जाताजातासुद्धा आम्हाला ढेकणांनी थोडाबहुत त्रास दिला, पण तरीदेखील आम्ही मजल दरमजल करीत दुसर्या आटपाट नगरात पोहोचलोच.
ते आटपाट नगर आमच्या नगरापेक्षा खूपंच छान होतं. रुंद रस्ते, बागा, नद्या झालेले नाले, सोनेरी केस असलेल्या युवती आणि रुबाबदार बलदंड युवक, सारेच कसे निरळे होते आणि अतिशय सुंदर. पहिल्याच दिवशी आम्ही आमचे नगर विसरून गेलो आणि एक अख्खा दिवस ढेकणांनी त्रास न दिल्याने ढेकूणही विसरून गेलो. पण जुन्या मित्रांची ओळख इतक्या सहजासहजी थोडीच जाते? राहून राहून कधितरी आम्हाला ढेकणांची आठवण येई. मग आम्ही आमच्या नगराकडून येणार्या लोकांना आमच्या नगरीच्या वार्ता विचारत असू आणि झांलच तर ढेकणांचीही चॊकशी करीत असू. मझ्या जुन्या आटपाट नगरातले काही लोक मला ह्या नव्या अतिआटपाट नगरांत भेटले. आम्ही सर्वजण एकत्र जमलो की जुन्या नगरातल्या ढेकणांच्या गप्पा रंगवत असू. कोणाला तिरंगी ढेकूण आवडत नसत तर कुणाला भगवे. मग त्यावरूनही वादावादी होई. पण शेवटी ह्या नगरांत येवून आपण कसे सुखी झालो ह्याच्या सुरस कथा सर्वजण सांगत. वर इथले ढेकूण त्रासदायक नसतात ह्यावर शिक्कामोर्तब होई.
माझाही अनुभव तसाच होता. इथले ढेकूण फारच निरुपद्रवी आणि सज्जन होते. हळुहळु माझी इथल्या सोनेरी केसांच्या युवतींशी आणि रुबाबदार बलदंड तरुणांशी ओळख झाली. त्यांना मी म्हंटलं की तुमची नगरी फार छान आहे, इथे ढेकणांचा अजिबात त्रास नाही, तर म्हणाले खरं आहे, आम्हाला ढेकणांचा अजिबात त्रास नाही. पण इथे कावळ्यांचा भारी उपद्रव आहे. काळे कावळे, सावळे कावळे, बारीक डोळ्यांचे चपटे कावळे, सगळे बाहेरून येतात आणि आमच्या नगरीची वाट लावतात. मी त्यांना म्हंटले की मला कावळे म्हणजे काय प्राणी असतात तेच माहित नाही. तर म्हणतात कसे, तुमच्या आरशात जावून पहा म्हणजे तुम्हाला दिसतील सावळे कावळे. आमच्या जुन्या नगरांत आरसा नवाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. तेव्हा आम्ही आमच्याच एका रुबाबदार मित्राकडून ती उधार घेतली. मग आम्ही सगळे जुन्या नगरांतले स्नेही आमच्या घरी जमलो आणि आम्ही आरसा ह्या वस्तूमधे पाहू लागलो. आरसा सर्वप्रथमच पहिल्यामुळे, सर्वांनाच उत्सुकता होती की काय दिसेल. सर्वांनी त्यात डोकावून पाहिले तर आम्हाला काही प्राणी दिसले. म्हंटले हेच बहुदा कावळे असावेत. पण त्यात्सुद्धा एक चमतकृती होती. मला ते सर्व कावळे माझ्या स्नेह्यांसारखे दिसत होते. एकच कावळा काय तो अनोळखी वाटंत होता. माझ्या स्नेह्यांचाही अनुभव हाच होता. पण त्यांना म्हणे एक कावळा माझ्यासारखा दिसत होता. पण मला मात्र एखादा कावळा मझ्यासारखा असेल असे वाटत नव्हते.
शेवटी वादावादी होवून आम्ही असे ठरविले की आम्ही आणलेली आरसा ही वस्तू बरोबर काम करत नसावी आणि म्हणुनच आम्हाला कावळे आमच्यासारखे असल्याचा भास होत असावा. म्हणून आम्ही अधिक महागाची आरसा ही वस्तू आणली. पण तरीसुद्धा मागले पाढे पंचावन्न. शेवटी आरसा ह्या विषयावर बरेच संशोधन केल्यावर आम्हाला असे लक्षात आले की त्यात दिसत होतो ते आम्ही सर्वच होतो. आणि इथल्या नागरिकांना त्रास देणारे कावळा नावाचे प्राणी आम्हीच होतो. पुढे अशीही माहिती उजेडात आली की आम्ही सावळे कावळे आहोत. अजून काही आफ्रिका खंडीय नगरांतून इथे काळे कावळे येतात. पीत प्रदेशांतील नगरांतील कावळे बारीक डोळ्यांचे आणि चपटे असतात. आमच्या जुन्या नगराच्या आजुबाजूच्या नगरांतून येणार्या कावळ्यांचा रंग, सावळा असतो. काही पूर्व युरोपीय नगरांतून पांढरे कावळेही येतात म्हणे.
आता फक्त एकच प्रश्न आमच्या मनांत घोळत राहिला, की आपल्या जुन्या आटपाट नगरांत जावून ढेकणांचा त्रास सहन करत माणूस म्हणून जगायचं की नव्या अतिआटपाट नगरांत कावळा बनून आपले आयुष्य सुखात घालवायचं?
अशी ही साठा उत्तराची कहाणी साता उत्तरी सुफळ पण तरीही अपूर्णच.....

Subscribe to:
Posts (Atom)