Saturday, February 24, 2007

Formality नावाची Abnormality......

Formality चा त्रास तुम्ही कधी अनुभवलाय का? मला हल्ली फार जाणवायला लागलंय की सगळं अधिकाधिक Formal होत चाललंय. मॆत्री Formal, भांडण तेसुद्धा Formal, हसणं formal, रुसणंसुद्धा formal. कशामुळे होतंय हे?

परवा एकाला आणि त्यच्या बायकोला जेवायला बोलावलं. का? सहवासाने आनंद मिळतो म्हणून? नाही. चक्क formality म्हणून. त्यांनी आधी आम्हाला बोलावलं होतं, मग आम्हीपण त्यांना बोलावलं पहिजे ही expectation असते म्हणून. खरंतर असं चार चॊघात सांगणं हे निलाजरेपणाचं ठरेल. पण करावं तरी काय? बरं तर बरं इस हमाममें तो सभी नंगे हॆ. कोणाला कोणाची लाज वाटणार?

मला तर ह्या प्रकरणाचा विलक्षण उबग आलेला आहे. ह्यांनी असं केलं, आणि त्यांनी तसं केलं, मग आम्हीपण काहीतरी केलं पाहिजे हे pressure. कशासाठी? एखादी गोष्ट केवळ मनाला भावली म्हणून नाही का करता येणार? एखादी व्यक्ती मनापासून नाही आवडली तर त्या व्यक्तीला दूर नाही का सारता येणार? म्हणजे त्या व्यक्तीचा काही दोष आहे असं नव्हे, पण सूरच जुळला नाही तर गाणं कुठलं जन्मायला? नुसती बेसुरांची भाऊगर्दी.

कदाचित ह्यामागे insecurity ची भावना असेल. जेवढे लोकं, कृत्रिमरित्या का होईना, पण आपल्या आजूबाजूला बांधून ठेवता येतील तितके ठेवायचे. कधी गरज लागेल सांगता येत नाही. कदाचित हा स्वार्थ formality मागे असेल.

माणसाने फुलपाखरासारखं का जगू नये? आवडेल त्या फुलावर बसावं, नावडेल ते फूल सोडून द्यावं. फुलपाखरू पण नावडत्या फुलाचं मन राखंत असेल का? formality म्हणून? उद्या आवडतं फूल नाहिसं झालं तर काय घ्या? म्हणून?

आपण सगळेच business like होवू लागलोय. सगळ्याचा business केलाय आपण. मागच्या आठवड्यात अमुकने मला फोन केला, म्हणून ह्या आठवड्यात मी त्याला केला पहिजे. तमुकचे एवढे मित्र, मग माझेपण हवेत. मग मी मित्र जमवायचा धंदा सुरू करायचा. तसं झाली की मॆत्री गेली बाजूला, formality तेवढी शिल्लक. मग नको ते प्रश्न सतावायला लागतात. अमुकने घरी पार्टी केली, तमुकला बोलावलं, पण मला नाही बोलावलं, अशी रिकामटेकडी भुतं मानगुटीवर येवून बसतात. आपण मॆत्रीचा business तर करून टाकला नाहिये ना?

काय साधतोय आपण ह्या business मधून? कोणता profit मिळवतोय? अधिकाधिक लोकांशी आपलं जमतं किंवा अधिकाधिक लोकं मला मित्र मानातात हे बेगडी समाधान? का उद्या गरज लागली तर दहा लोकं मदतीला धावतील हे untested assumption? कशाला हवंय हे सगळं?

प्रत्येकाने स्वतंत्रपणे का फुलू नये? बाजूचं फूल कसं फुलतंय यावर आपलं फुलणं अवलंबून असावं का? Comparison किंवा Competition आली की मग formality हळूच मागच्या दारानं प्रवेश करते, दूध प्यायला खिडकीतून चोरून घुसणार्‍या मांजरीसारखी. ती नुसताच आपला आनंद हिरावत नाही, तर आपल्याभोवती एक अभेद्य कवच निर्माण करते. समोरचा माणूस त्या कवचापशीच येवून थांबतो. त्याचं माणूसपण जाणवतंच नाही. जाणवत रहातात त्या अतिशय निरुपयोगी वरवरच्या गोष्टी.

आणि मग होतात माणसांची बेटं. बाह्यरंगी सुंदर, आकर्षक पण दुर्गम. त्या बेटांमधले दुवेच नाहिसे झालेले असतात. मधे फक्त उरतो formality चा अथांग सागर. आज त्यानं आपली बेटं केलीत. उद्या तो ही बेटंही पुरती बुडवणार हे निश्चित.

वाटतं "जागते रहो" मधल्या मोतिलाल सारखं धुंद होवून एकदा तरी म्हणावं,

दिलने हमसे जो कहा
हमने वॆसा ही किया

फिर कभी फुरसतसे सोचेंगे
बुरा था या भला

जिंदगी ख्वाब हॆ
ख्वाब में झूठ क्या, ऒर भला सच हॆ क्या?

सब सच हॆ......

10 comments:

Vidya Bhutkar said...

'आणि मग होतात माणसांची बेटं. बाह्यरंगी सुंदर, आकर्षक पण दुर्गम. ' ही वाक्ये आवडली खूप. Formality चा खरंच खूप कंटाळा आलाय. वाटतं, कमी का असेना जवळची नाती हवीत.

-विद्या.

सुनिल काशीकर | Sunil Kashikar said...

मित्रा 'जागते रहो' मधल्या ओळी किती soothing आहेत. फारच छान!

Anu said...

Changale varnan. malahi barechada asech vatate. Pan 'Kon kadhi kamala yeil sangata yet nahi, ani kamala nahi ale tari chalel, pan kon kadhi relation maintain karat nahi mhanun apale pratyaksha apratyaksha nukasan karel mahit nahi' ya insecurity madhun hi formality yet asavi.
-Manogatavaril anu

Anonymous said...

Agadi khara aahe he ! 100 takke patala!!
Formalities chya nadat kadhi kadhi aapan swatala kay hawa aahe/kay awadate he pan wisrun zato :(

कोहम said...

विद्या, सुनील, अनु आणि anonymous, आपल्या प्रतिसादाबद्धल धन्यवाद. माझ्यासारखे अजून्ही काही formality ग्रस्त आहेत हे वाचून दिलासा मिळाला.

Anonymous said...

aapla formality lekh aawadla

awyakta said...

aata heech blog post baghaa naa !

"Formality चा त्रास तुम्ही कधी अनुभवलाय का? मला हल्ली फार जाणवायला लागलंय की सगळं अधिकाधिक Formal होत चाललंय. मॆत्री Formal, भांडण तेसुद्धा Formal, हसणं formal, रुसणंसुद्धा formal. कशामुळे होतंय हे? "

yaachi suruwaatach "Lokansaathi" keli kaa naahi ? :)

Hee post kewal swatah saathi kaa naahi thevli ? Kuthetari lokanni waachoon reply dyaavet hee bhaavna tyaamaage navhati ? Jar lokanni reply naste kele / konich nasta wachla tar ?


I may be wrong, pan Maajha general observation asa aahe ki Kharya bhavna, vichaar kadhi vyaktach karta yet naahit !
kimbahuna swatahla aarakhnyachi teech kasoti.

Tyamule majhya jawalpas ashich mandali astaat ji rokhthok aahet ! An mi hi taslach ! ;)

Anonymous said...

Web Our Ineffectual Prices at www.Pharmashack.com, The High-level [b][url=http://www.pharmashack.com]Online Chemist's boutique [/url][/b] To [url=http://www.pharmashack.com]Buy Viagra[/url] Online ! You Can also Underline to Super Deals When You [url=http://www.pharmashack.com/en/item/cialis.html]Buy Cialis[/url] and When You You [url=http://www.pharmashack.com/en/item/levitra.html]Buy Levitra[/url] Online. We Also Enfold a Mammoth Generic [url=http://www.pharmashack.com/en/item/phentermine.html]Phentermine[/url] On account of Your Exhort ! We Recount away Marque set aside in sight as [url=http://www.pharmashack.com/en/item/viagra.html]Viagra[/url] and Also [url=http://www.pharmashack.com/en/item/generic_viagra.html]Generic Viagra[/url] !

Anonymous said...

I read this forum since 2 weeks and now i have decided to register to share with you my ideas. [url=http://inglourious-seo.com]:)[/url]

Anonymous said...

Making money on the internet is easy in the hush-hush world of [URL=http://www.www.blackhatmoneymaker.com]blackhat seo forum[/URL], You are far from alone if you have no clue about blackhat marketing. Blackhat marketing uses little-known or little-understood avenues to produce an income online.