Wednesday, April 22, 2009

कसं काय बरं हाय आय ऍम मुंभाय

मुंबई? बंबई? बॉम्बे? की मुंबाय?

कॉलिडोस्कोप.

ओबेरॉयच्या एकविसाव्या मजल्यावरच्या काचेतून रात्रीचा झगमगाट दाखवणारी, धारावीच्या गल्ल्यातून वाळणाऱ्या चामड्याच्या चळतीमधून नाक दाबून श्वास घेणारी, मलबार हिलच्या टुमदार टेकड्यांमधल्या आलिशान घरातून झोपेशिवाय तडफडत जागणारी किंवा रस्त्याच्या कडेला डोक्यावर टोपली घेऊन घनघोर पावसात निवांत झोपलेली.

फोर्ट फाउंटनमधली जुन्या इमारतींनी सजलेली ब्रिटिश मुंबई, उंचच उंच इमारतींनी विद्रूप झालेली मुंबई. धरण फुटल्यासारखी वाहणारी मुंबई, उष्ण रक्ताचा अभिषेक करून घेणारी मुंबई आणि समुद्राच्या थंड वाऱ्याने गपगार झालेली मुंबई, बॉलीवूडची मुंबई आणि एनसीपीए पृथ्वी वाली मुंबई.

अफाट पैशाने पोट फुटेस्तोवर भरलेली मुंबई, मध्यममार्गी मध्यमवर्गियाची बिचकत जगणारी मुंबई, पोटाची खळगी भरण्यासाठी ओठाला रंग लावून पाय पसरणारी मुंबई, सर्वस्व लुटणारी मुंबई आणि सर्वस्व लुटवणारी मुंबई. रेल्वे लाइनच्या कडेला शरीरधर्म उरकणारी निर्लज्ज मुंबई, लोकल ट्रेन्मधून रेल्वे लाइनच्या कडेला बसलेल्या लोकांना नाकं दाबून शिव्या देणारी मुंबई, आश्वासनं देणारी मुंबई आणि आश्वासनं न पाळणारी मुंबई.

मुंबईत राहणाऱ्यांच्या मनातून उतरलेली मुंबई आणि मुंबईत न राहणाऱ्यांचा मनात भरून राहिलेली मुंबई.

मुंबईचा जावई, बाँबे बॉइज, जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान. मुंबई नगरी बडी बाका. बंबईसे आया मेरा दोस्त, मुंबई तुमची भांडी घासा आमची, मुंबई माझी लाडकी, मी मुंबईकर.

अल्ला हो अकबर, गणपती बाप्पा मोरया, आवाज कुणाचा? जय भीम. जो बोले सो निहाल, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराजकी जय.

केम छो? कैसन हो?

कसं काय बरं हाय आय ऍम मुंभाय.

मुंबई इज फ्युजन. बट मुंबई इज ऑल्सो अ हेल लॉट ऑफ कनफ्युजन.



------------------------

इन्स्पिरेशनबद्दल धन्यवाद....

-----------------------

14 comments:

Sneha said...

sahichhhhhh....

aayushya jagayala shikavayach vidyapith mhanajehi mumbai...

Anand Sarolkar said...

"Mumbai ka bhai kaun?"...Koham :)

Raj said...

छोटा छोटा मॅटर बने पुलिस केस

बडा बडा लफडा गुल विदाउट ट्रेस

मस्तच :)

यशोधरा said...

>>मुंबईत राहणाऱ्यांच्या मनातून उतरलेली मुंबई आणि मुंबईत न राहणाऱ्यांचा मनात भरून राहिलेली मुंबई.>>> :)

प्रशांत said...

nice. :)

Jaswandi said...

mast lihilays... :)
Mumbaivishayi jitka bolu, jitka lihu kamich vatata na?

Anand Sarolkar said...

Raj ani Yashodharache comments khas :)

Maithili said...

MASTACH.
chyhan lihilay....

Anonymous said...

अच्छी ब्लॉग हे / आप मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मुजे मिला "क्विलपॅड" /
आप बि " क्विलपॅड" www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या..?

ओहित म्हणे said...

मित्रा आठवण करून दिलास बघ परत एकदा!! जितक्यावेळा परदेशातून परतलोय, तितक्यावेळा तितक्या पटीने आवडणारी मुंबई. विमान उतरताना मुंबईकडे बघताना होणारा आनंद केवळ ते ते डोळेच जाणतील. या सगळ्या परतणाऱ्या लेकराना उब देणारी मुंबई.

सखी said...

मुंबईत राहणाऱ्यांच्या मनातून उतरलेली मुंबई आणि मुंबईत न राहणाऱ्यांचा मनात भरून राहिलेली मुंबई.
ऐसा नहीं है सरजी,जैसी है वैसी हमारी मुंबई हमारी जान है। :)

खूप खूप बरं वाटलं, मुंबईप्रेमाला आळवल्याबद्दल धन्यवाद।

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

Sunder.
And this is my take on Mumbai
http://sonalwaikul.wordpress.com/2009/05/06/धादघाग-मुंबई/
:) Thoda wegala aani thoda saarakha.

अपर्णा said...

"उंचच उंच इमारतींनी विद्रूप झालेली मुंबई" हे बर्यापैकी जाणवलं यावेळी. पण जगात कुठेही राहिलं ना तरी मुंबईत एकदा राहिलं असलं की तीच का इतकी आवडते हे कुणी सांगु शकेल का??

Naik's said...

Dear Nilesh

I am very glad to see your blog.
Koham do U know?

Ask Manasi. She will tell you.

AAK