Sunday, September 14, 2008

चिऊ आणि काऊ

ती - किती उशीर?

तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर.

ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते.

तो - बरं.

ती - फक्त बरं?

तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो.

ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू?

तो - म्हणजे कसा?

ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो.

तो - डोकं फिरलंय त्याचं?

ती - त्याचं की तुझं?

तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला?

ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं?

तो - नाही.

ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू.

तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार.

ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही.

तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये.

ती - अरे देवा

तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.

ती - बरं

तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय?

ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं.

तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां.

ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार.

तो - आता?

ती - हं आता.

तो - बरं जातो.

ती - ए काऊ थांब रे.

तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब.

ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे.

तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या.

ती - काऊ तू मला खूप आवडतोस.

तो - मला माहितेय.

ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं.

तो - बरं.

ती - अरे आता म्हण.

तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस.

ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे.

तो - बरं.

ती - ...

तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे.

ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस.

तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया.

ती - चल.


- कोहम

22 comments:

Unknown said...

oh god.. kasla cute lihlays !

Monsieur K said...

:))

Meghana Bhuskute said...

hehehe! sahiye... cute hach shabd.

Anand Sarolkar said...

sahiye... :)

HAREKRISHNAJI said...

teriffic

Raj said...

mqsta :)

स्नेहल said...

sundar!!!

तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.
>> haa agadi maza funda aahe :) maja aali..

Bhagyashree said...

अरे..मी आणि नवर्‍याने हा संवाद मोठ्याने वाचून पाहीला.. नाटकासारखा! आईशप्पथ किती सूट व्हावं हे आम्हाला? भारीच!

Priya said...

:)

प्रशांत said...

हाहाहा...
आता "काऊ-चिऊ"पणा हा नवीन वाक्प्रचार अस्तित्वात यायला हरकत नाही.
हा पॅटर्न फारच आवडलेला दिसतोय.

छान झालंय.

Sumedha said...

छान!

पण तुझ्या आधीच्या संवादांइतकी मजा नाही आली... may be त्या form चे नाविन्य जरा कमी झालेय म्हणून! झक्कास वेगळे लिही बुवा!

Asha Joglekar said...

Chan aahe pan bhalayach unromantic tumacha kaoo/

Samved said...

हहहहहा...अरे सद्गृहस्था....किती हसवशिल? पोट दुखतय....मी बायकोला वाचून दाखवतोय आणि दोघेही गाढवासारखे(!) हसतोय..

"मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये."

एकदम सिझन्ड नवरा वाक्य....भले....

सुप्रिया.... said...

Bhannat lihilays yaar....maja aali vachatana[:)]

Nandan said...

:)

a Sane man said...

एकदम लक्ष्यमधल्या "अगर मैं कहूँ.." सारखं! :)

Dhananjay said...

hmmm... :)

Aparna Pai said...

surekh..

thodishi va punchi chhap alyasarkhi vatate

Anonymous said...

Oh! Mi tuzi khup aabhari aahe!!!
Karan aata mala mazya b.f. saathi navin naav milal Kaooo ha! ha! ha!
aata tyach lavkarch baaras ghalin.

Ani khup chaan lihitos tu.

Harshada Vinaya said...

[:)]
unromantic kaoo.. !!!

Akira said...

majja ali wachtana :)

Dk said...

तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट.>>>>>>

are kau pan ekaarnt aadnaavaachaa aahe ka ;)