Wednesday, May 21, 2008

शिकरण

तो - झाल्या का पोळ्या? खूप भूक लागलेय.

ती - झाल्या ना. मलाही भूक लागलेय पण पोळ्या करायला वेळ लागतो.

तो - म्हणूनच सांगत होतो, लवकर स्वैपाकाला लाग.

ती - आणि तू काय करशील? सोफ्यावर बसून टी. व्ही. बघशील?

तो - तसं नाही गं. जरा जास्तच भूक लागली होती म्हणून जरा. ते जाऊदे. कसली भाजी आहे.

ती - नाही

तो - ही कोणती नवी भाजी? नाही?

ती - म्हणजे भाजी नाही.

तो - भाजी नाही? मग काय नुसत्याच पोळ्या खायच्या काय आज?

ती - हे बघ मला स्वैपाक करायला वेळ लागतो. सवय नाही. आणि तुला भात, भाजी, आमटी, पोळी सगळं लागतं. आज भाजी चिरायला वेळच मिळाला नाही.

तो - मला सांगायचं

ती - सांगितलं. पण कॉम्प्युटर समोर बसलास की तुझ्या कानाची होते फुंकणी. नळी फुंकिली सोनारे. इकडून तिकडे गेले वारे.

तो - मी फुंकणी आणि तू सोनार? जरा जोरात फुंकायचं ना. ऐकू आलं असतं.

ती - जेवायचंय ना? की फुंकर मारू अजून एक? माझ्या ऑफिसमधल्या लोकांना मी केलेल्या पोळ्या खूप आवडतात. तुला नसतीलच खायच्या तर ते खातील.

तो - नको. एवढं अन्नदान नको.

ती - कंजूस.

तो - मुद्दा तो नाही आहे. तू आज पोळ्या केल्यास म्हणून तुझे जाहीर आभार. पण आता त्या पोळ्या पाण्याबरोबर खायच्या का?

ती - नाही.

तो - हवेबरोबर?

ती - शिकरण केलंय. ते वाढून घे आणि गीळ किती गिळायच्यात त्या पोळ्या.

तो - शिकरण केलंय? अरेरेरे, काय ही भाषा. शिकरण स्त्रीलिंगी. ती शिकरण, ते शिकरण नाही.

ती - ई.... ती शिकरण काय. ते शिकरणच बरोबर आहे. ते केळं आणि त्याचं ते शिकरण.

तो - फालतू लॉजिक सांगू नकोस हं. तुला गाणं आठवतं का ते? केळ्याची शिकरण करायला गेली धुपकन पडली आत?

ती - आठवतं.

तो - मग मान्य कर की चूक झाली.

ती - चूक तुझी होतेय. मला आठवतंय, केळ्याचे शिकरण करायला गेली धुपकन पडली आत. चुकलायस तू मी नाही.

तो - हे बघ तू मला बाकी कशाचंही लेक्चर दे, पण मराठीचं देऊ नकोस.

ती - का बरं का? मी तुला कसलंही काही सांगायला लागले की तुझं हेच. हा विषय सोडून दुसरं कशाचंही लेक्चर दे. असे काय दिवे लावलेस रे तू मराठीत? पु. ल. देशपांडेच की नाही तू? की आचार्य अत्रे?

तो - अगदी तितका नसलो तरी थोडं फार लिहितोच की मी

ती - कुठे? ब्लॉगवर? काळं कुत्रंतरी वाचता का रे तुझा तो ब्लॉग? अरे ब्लॉग लिहिण्यापेक्षा जरा घरातली कामं कर, म्हणजे शिकरण खायची वेळ येणार नाही. मी एकटीने काय काय म्हणून करायचं.

तो - मुद्दा मी कुठे काय लिहितो हा नाहीये. मुद्दा हा आहे की माझं मराठी तुझ्यापेक्षा चांगलं आहे.

ती - हे आपलं तुझं मत. तुझ्या मताला मी किंमत देत नाही.

तो - ते माहितेय मला. आजचं का आहे ते. पण हे माझं मत नाही. दहावीत मला मराठीत ऐंशी मार्क मिळाले होते.

ती - मला एटीटू मिळाले होते.

तो - अगंपण माझी फर्स्ट लँग्वेज होती मराठी.

ती - लँग्वेज होती ना? मग तर झालं. मार्क कुणाला जास्त होते? मला. मग मराठी कुणाला जास्त येतं? मला? मग ती शिकरण का ते शिकरण? ते.

तो - च्यायला. तुला शिकवणारे धन्य आणि तुला मार्क देणारे त्याहून धन्य.

ती - ए. जास्त बोलू नकोस हां. माझी आईच शिकवायची मला. आणि तिला तिच्या आईने शिकवलं.

तो - तरीच.

ती - लाज नाही वाटत माझ्या माहेरच्यांना नावं ठेवायला?

तो - नावं ठेवायची नाहीत म्हणूनच तर लग्नात तुझं नाव नाही बदललं.

ती - फार उपकार केलेस हं. बदललं असतंस तर बदडलं नसतं तुला?

तो - पुन्हा विषयांतर करू नकोस. मुद्दा वेगळाच आहे.

ती - ते शिकरण

तो - ती शिकरण

ती - मी जेवतेय तुला हवंय?

तो - हो.

ती - पोळीबरोबर ते..... शिकरण देऊ का?

तो - मला ती शिकरण दे तू ते शिकरण खा.

ती - आता कसं शहाण्या मुलासारखं बोललास.

तो - थांब पोळ्या थंड झाल्यात मायक्रोव्हेव करून आणतो.

ती - शहाणा माझा बाळ.

तो - हं.

------------------------

हा फॉर्म (मला) भलताच आवडला असल्याने अजून एक संवाद

------------------------

35 comments:

Jaswandi said...

hehe.. sahich..
TI Shikaran :D :D

BTW blogwar TI post ki TO post?

Bhagyashree said...

TE shikaraN ch barobar haa ! ti nahi kahi...
ani bayko vakyam pramanam! thodi kama karavit.. mi navryala denar ata ha blog vachayla... :)
mast ch lihlays re ! aur ane do !!

.... said...

sahich... ee ti nahi te shikhran barobar aahe
dhapakan padali ti bahuli..ti bahuli...

Monsieur K said...

absolutely hilarious conversation :)

Jaswandi said...

aye sorry 2 comments khatye.. pan TI Shikaran ch barobar ahe

Meghana Bhuskute said...

afalaatoon! plz write more...

Yashodhara said...

ती शिकरण??? कधीच नाही ऐकलं असं!! 'ते शिकरण' हेच बरोबर आहे!! :D
बाकी, लेख एकदम झक्कास!! आवड्या!!!

सर्किट said...

:-)

changala form ahe, gaDagiLanchya baNDu ani snehalata chi aThavaN zali. :)

Anand Sarolkar said...

Mast:)

Anonymous said...

phaar bhaari. amachya gharatil samvad tantotant vachalyasarakha watatoy.. mazya bayakoche tar mhanaje aahe ki he post mich lihilay..

maze tumhala anumodan.. "ti" shikaranach....

Tulip said...

haha.. sahi lihilayas :)) tu kobra ani bayko debra ahat asa disatay:P

Vidya Bhutkar said...

:-) Agadi mich polya lattana bhandtey asa vatala. hehehe :-D Btw, te shikran, ti nahi. :-)
-Vidya.

पूनम छत्रे said...

सही सं’वाद’! :)
’ती’च बरंका ;-)

Samved said...

ह्य्य्य्य्य्य्याआआ
जब्बर भारी..गिळलंस की नाही रे बाबा "ते" शिकरण?

आणि तू अजून सर्कशीत नवा की काय? बायडी बरोबर वाद? शांतं पापं

प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

ती शिकरणच बरोबर आहे.

असो. वादविवादात मजा असते.

Sangram said...

शप्पथ!! काय कलकल!! आजूबाजूला ईंडीअन हॉटेल्स नाहीत काय?

बाकी थॅंक गॉड "काळं कुत्रं" वगैरे लोक तुझा ब्लॉग वाचत नाहीत! नाहीतर पुढच्या वेळी वाचताना विचार करावा लागला असता!

Lopamudraa said...

hilarious... mast!!!!!

Kuldip D Gandhi said...

Dhanashree V Phatak :-
Ae Khup ch chhan lihile aahe, sarwaan kadech ghadnaarya prasanga che hasrya, khelkar shaili madhye varnan kele ahe.

Deep said...

ते शिकरण की ती शिकरण????
आतापर्यंत हे कुणीही असं का? हे सांगु शकलेलं नाही, म्हणुन मी प्रयत्न क री त आहे,
ते केळं * ते दुध* + ती साखर = ती शिकरण :)

deep
A conclusion is simply the place where you got tired of thinking

TheKing said...

Don't take pangaa with bayko! pudhacyaa veli polyahee milnaar naheet.

Samved said...

अरे बाबा निलेश, तुझं हे पोस्ट आमच्या ऑफिसमध्ये "आय टी तील नवरा-बायकोचं भांडण" या नावाने फिरत आहे. ज्या बायने ते कॉमन इनबॉक्स मधे टाकलं, त्या बायला मी झाडलं तर साळसुदपणे म्हणाली की तिला ते फॉरवर्ड म्हणून आलय...
जरा शोध घे..नाही तर ट्युलिपसारखं व्हायचं पुन्हा

कोहम said...

Samved,

Thanks. ha post bahuda http://tphitp.in hya site varun chorala asava asa vattay.

Google madhe search keli tar tithe chiktavalela adhaLala. tithe lekhakala credit dya ashi comment takun aloy. hyauppar apaN karaNar tari kaay?

Apala likha mhanaje open source code aahe, kuNihi Ctr C karava aNi ctr V karava.

Sud said...

this is great!

प्रशांत said...

आणखी एका ब्लॉगवर हा लेख आहे.

http://anandjawadwar.blogspot.com/2008/06/ek-bhandan-writer-unknown.html


काही गोष्टींवर इथे प्रकाश टाकतो. त्यावर तुला योग्य वाटेल ती भूमिका तू घेशील.

"....blog वरील कविता माझ्या आहेत असे मी कुठेही mention केले नाही...." असं लिहिलेलं पोस्ट पहा :
http://anandjawadwar.blogspot.com/2008/06/blog.html

वरील पोस्ट त्या ब्लॉगकाराचं "स्पष्टीकरण" होऊ शकत नाही. त्यात "शिकरण" हे पोस्ट म्हणजे कविता नाही. "writer unknown" असं लिहून प्रकाशित केल्याने, त्या लेखनाचा प्रकाशन स्वतः त्या पोस्टाचा लेखक नाही एवढंच सिद्ध होतं. टोपणनावाने लेखन केलं म्हणून "writer unknown" होत नाही. एखादी जुनी साहित्यकृती प्रकाशित करताना खरोखर साहित्यिकाचं नावं माहित नसल्यास (ती माहिती उपलब्ध करण अवघड असल्यास) तसं लिहिणं समजून घेता येईल. पण निदान दुसर्‍या ब्लॉगवरून एखादं लेखन appreciate करण्याच्या हेतूनेसुद्धा प्रसिद्ध करायचं असल्यास ब्लॉगकाराची अनुमती मागण्याची सोय आहे तिचा उपयोग केलेला नाही. या खेरीज, ब्लॉगर डॉट कॉम कडे प्रताधिकार असण्याची दाट शक्यता आहे.
असो.

ब्लॉगलेखनचौर्य हा विषय पुन्हा एकदा वर आला आहे. सर्वांनी मिळून काहीतरी करणं गरजेचं आहे.

Bhitri Bhagu said...

मला पण हे पोस्ट बर्‍याच जणांनी फॉरवर्ड केलं, त्या सर्वांना मी चांगलाच झापलं.

Yashodhara said...

kay he? kiti choRyaa hya asha? :( mage ekada majhya bolgavrun charolya chorun apalya blogavr dakavalya hotya konitari, maga tithe jaaun tasa lihilyavar blog udavun dilaa!! :(

kay karayach hya chor pravrutticha?

Ashish Wakade said...

ti shikaran ch barobar ahe.

Anand another name for happiness said...

Hi your post was awesome. :)
I removed it from my blog as I found its origin no need to have it on my blog :)

a Sane man said...

ushirach vachlay...dhammal zalay!...tee shikraN gaTat aahe mi hi..:)

Karadkar said...

http://mangeshkakade.wordpress.com/

One more culprit!

Tulip said...

arre kay he neelesh! tujha itaka surekh post tujhya navachya ullekhashivay firatay:(. tya blog var tar ajun ahe.tras ahe kharach hya aslya vrutticha.

TheKing said...

Found one more chor!!

http://everything4fun.rediffiland.com/blogs/2008/06/25/Conversation-of-IT-couple-marathi.html

Kanakhaalee ganapati kadhla pahije salyachya!

Vishakha said...

"Ti" Shikaran barobar ahe :):)Pan mulaat tujhya bayko ne aadhich "Ti" bhaji keli asti tar he bhandan zalach nasta...
ho kka nay?? Moral of the story, baykola bhaaji chirun dyavi. :):)

RAJ SINH said...

mee marathee!mee mumbaikar!lihan kiti sundar!

ज्ञानराज said...

एक नंबर! मनापासून आवडली. पोस्ट, आणि तुझी लिहीण्याची स्टाईल! :)