Friday, August 17, 2007

भारत अधुन मधुन माझा देश आहे

भारत माझा देश आहे? खरंच आहे का? असेल बहुदा.

आजच्या दिवशी म्हणे भारताला स्वतंत्र्य मिळालं. हं, स्वातंत्र्य. हे बाकी चांगलं झालं हं. म्हणजे काय की प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य हे हवंच. आत बघा आमची हयात गेली स्वातंत्र्य मिळवण्यात. म्हणजे लहान होतो तेव्हा अभ्यासापासून स्वातंत्र्य, थोडे मोठे झालो तसे पालकांच्या कटकटीपासून स्वातंत्र्य, मग वेगवेगळ्या गर्ल फ़्रेंड्स ना भेटताना ओळखीच्या माणसांच्या नजरांपासूनचे स्वातंत्र्य, लग्न करण्याचे स्वातंत्र्य, लग्नाआधी लग्नानंतरचे करायचे स्वातंत्र्य, आणि लग्नानंतर लग्नाआधीचे करायचे स्वातंत्र्य.

सगळ्या स्वातंत्र्याची भंकस झालेय यार, मग कसला स्वातंत्र्यदिन सेलेब्रेट करायचा. त्यात सेलेब्रेशन म्हणजे आधीपासूनच स्टॉक आणून ठेवायला लागतो. साला स्वातंत्र्यदिनाला तरी आम्हाला काय पाहिजे ते प्यायचे स्वातंत्र्य द्याल की नाही?

थोडक्यात काय? तर स्वातंत्र्य इज अ व्हेरी इंपॉर्टंट कमॉडिटी. म्हणजे कसं एकदम फ्री वाटलं पाहिजे यार. दारू पाहिजे तर दारू, गांजा पाहिजे तर गांजा, चरस पाहिजे तर चरस. काय? जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. पण बघा ना. आता उद्या पकडलं मला गांजा पिताना तर माला आत घालणार पोलिस. माझ्या जागी कोणी इंफ्लुएंशियल पोरगा असला की पोलिस, त्याच्याबरोबर गांजा ओढणार. म्हणजे सगळ्या इंफ्लुएंशियल डुकरांना स्वातंत्र्य. पण आमच्या सारख्या नॉन इंफ्लुएंशियल..... घाबरू नका, माणसांचं म्हणत नाहीये......तर आमच्या सारख्या नॉन इंफ्लुएंशियल डुकरांचं काय? आम्हाला कसलं आहे स्वातंत्र्य? हे चिखलात लोळले तर हर्बल मड बाथ, आम्ही लोळलो की गटार काय?

रोजचंच झालंय यार. ये सिस्टिम ही साली सडेली आहे. काहीपण होणार नाही ह्या देशाचं. हं दर वर्षी स्वातंत्र्यदिन मात्र सेलेब्रेट करायचा आपण. सेलेब्रेशन्स तर काय चालूच असतात त्यात हे अजून एक सेलेब्रेशन.

सेलेब्रेशन वरून आठवलं. परवा आमच्या कॉल सेंटरमध्ये टार्गेट अचिव्हमेंट चं सेलेब्रेशन होतं. सगळे साले पिऊन टुन. पण एक आहे सालं, प्यायला ना की खोटं खोटं का होईना पण स्वातंत्र्य मिळाल्याचा भास होतो काय? सगळ्या कटकटीपासून मुक्ती. हं, तर तिथे ती सॅम भेटली. सालीचं नाव सीमा आहे पण हिला बोलवायचं सॅम. सॉलिड फटाकडी आहे.

तर मी सांगितलं तसं दारू पिऊन माला स्वतंत्र वाटतच होतं. म्हटलं बघूया स्वातंत्र्याचा काही उपयोग होतोय का तिला जरा खोपाच्यात घ्यायला. साली.. बिलकुल भाव दिला नाही. सतत त्या टकल्याबरोबर फिरत होती. टकल्या म्हणजे आमचा बॉस. यू.एस. ला पाठवतोय तिला ट्रेनिंगला. साली दिवसभर फोनवर कस्टमर्सची चाटते आणि संध्याकाळी बॉसची.

पण तेही बरोबरच आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी काय उपयोग. वो टकल्या गे थोडीना है. पण चांगलं झालं. स्वतंत्र झाली साली थोड्या दिवसांसाठी तरी. आता यू.एस. ला जायचं आणि एखादा गोरा टकल्या शोधायचा म्हणजे पर्मनंटली स्वतंत्र. शेवटी काय स्वातंत्र्य महत्त्वाचं, ह्या देशापासून, ह्या सिस्टिम पासून.

मरूदे. हम तो साला इधरिच सडेगा, पूरी जिंदगी. ते मरूदे. काल नवा नोकिया घेतला. तीस हजारको लिया बाप. पण मॉडेल कसलं आहे. आमचा तो घाट्या आहे ना, तो माला नेहमी म्हणतो की, थोड्या दिवसांनी घे म्हणजे स्वस्त होईल. त्या अनाड्याला कळत नाही, की माणसाने अप टू डेट असायला पाहिजे. नवीन मोबाईल, नवीन आयपॉड, नवीन ऍपल, नवीन ब्लु बेरी, अरे ह्यात जी मजा आहे ती काय चावून चोथा झालेली मॉडेल घेण्यात आहे. आपण नेहमी लेटेस्ट मॉडेल्स वापरतो काय, मोबाईल असो नाहीतर पोरगी.

कसं एकदम स्वतंत्र वाटतं. लहानपणापासून शिकत आलो, काटकसर करावी, जास्त पैसे खर्च करू नयेत. एकदम फ़्रस्ट्रेट व्हायचो यार. बांधल्यासारखं वाटायचं. वाटायचं काय नाकर्तबगार आहेत आपले पालक. शाळेतल्या पोरांचं सगळं नवीन, लेटेस्ट. आपलं सगळं जुनं. म्हणून आता स्वतंत्र वाटतं. आपणही त्या शाळेतल्या पोरांसारखे लेटेस्ट, अप टू डेट झालो असं वाटतं. तुला कळणार नाही यार काय फीलिंग आहे ते. असं समज, तू रात्रभर दारू पितोयस, पेगवर पेग. अप बॉटम्सवर बॉटम्स अप. कसं वाटतं? सगळी ऍग्विश आपल्या पोटात ठासून भरलेय असं वाटतं की नाही. तसं वाटायचं मला लहानपणी. आणि आता? ते सगळं असह्य होऊन भडभडा ओकल्यावर जसं वाटतं ना? तसं वाटतं. स्वतंत्र. मोकळं.

साल्या आज तू नुसती मजा बघ. न्यूज मध्ये भाषणं दाखवतील ना ती बघ. म्हणे तरुण पिढीने ह्यॅव केलं पाहिजे नि त्यॅव केलं पाहिजे. हे साले खादी चड्डी, ह्यांना कोण विचारणार त्यांच्या तरुणपणी त्यांनी काय केलं ते. साले आमच्या बळावर स्वतंत्र झाले स्वतःच्या गरिबीतून. एकेकाचे बंगले बघा. गाड्या बघा. स्वतःचा उत्कर्ष बरोबर साधला हरामखोरांनी. हे काय करत होते देशासाठी त्यांच्या तरुणपणी. काही केलं असतं त्यांनी तर झालो असतो का आपण असे. ह्यांनी केलेल्या बलात्कारातून जन्मलेली आहे आजची परिस्थिती आणि म्हणूनच आम्ही असे आहोत नपुंसक आणि हो स्वतंत्र.

जाऊदे यार. फार हाय लेव्हलचं मराठी बोललो. तुला नाही समजायचं. तुलाच काय कोणी मला ऐकवलं तर मलाही नाही समजायचं. शाळेत असताना पुस्तकं वाचायचो. टिळक, सावरकर, गांधीजी. बाबू गेनूची गोष्ट वाचून डोळ्यात पाणी यायचं. भगतसिंग, राजगुरूची गोष्ट वाचून अंगात स्फुरण चढायचं. वाटायचं आपणंही काही असंच करावं देशासाठी. मग वाटायचं त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं पण आपण?

कॉलेजात मुलींची छेड काढली म्हणून गुंडांना हटकायला गेलो. तिथेच त्यांनी धुतला माला. आणि आंघोळीनंतर पंचा वाळत टाकावा तसा माला कट्ट्यावर टाकून निघून गेले.

पुढेपुढे त्याचीही सवय झाली. आपण षंढ आहोत हे मी स्वीकारलं. मला काय करायचंय? माझ्या बहिणीची तर नाही ना छेड काढली, मग मुझको क्या? ही वृत्ती बळावली. स्वतंत्र आहोत ना आपण? मग आपला एकट्याचा स्वतंत्र विचार करायला मी शिकलो. दुनिया गेली गाढवाच्या गांडीत. देशभक्ती वगैरे सगळं झूट आहे रे. कसला देश? एकत्र केलेले जमिनीचे तुकडे आहेत हे. म्हणे देश. मी पहिला कोण भारतीय? का हिंदू, मुसलमान, ब्राम्हण आणि महार. पहिली माझी जात, पहिला माझा धर्म आणि मग मी, मग माझा देश. बरोबर आहे, स्वतंत्र आहोत ना आपण.

हे सगळं पहिलं की वाटतं, खरं स्वातंत्र्य मिळेल जेव्हा मी मरेन. ते खरं स्वातंत्र्य असेल. तोपर्यंत दर वर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू. काय? फुल टाईट होवून. चिअर्स. तोपर्यंत भारत अधुन मधुन माझा देश आहे. जेव्हा टीम इंडिया क्रिकेट मॅच जिंकते तेव्हा....

---------------------------------------

हे साहित्य पूर्णपणे काल्पनिक असून, लिखाणात व्यक्त केलेली मते ही माझी वैयक्तिक मते नाहीत. काल्पनिक व्यक्तिने केलेले प्रथमपुरुषी निवेदन ह्या स्वरूपातील हे लेखन आहे.

---------------------------------------

13 comments:

Meghana Bhuskute said...

Yes, that's what we really mean by independence day. But why not? It's very easy to love sysmbols. Independence day is nothing but a symbol. Do we really want to go beyond that? Do we know what is India? Does such country exist really? Or it's just an illusion? What do we have in comman? Hindi films? Or our so-called passion for cricket team? Or our so-called 'cultural' background? What?

And hey, if one doesn't feel that he belongs to this thing called 'India', whose mistake is this? And why should it be corrected? Who is going to correct it? How?

Defining that may help us. Celebrating 15th August won't help. No matter how much responsibilty or seriousness we show while doing that.

prasad said...

really good post.. its a general apathy for independance day i am having..

Samved said...

अरे भयंकर आहे हे..

मागच्या महिन्यात खुप भटकंती खुप झाली म्हणून आधीच्या blog वर नाही लिहू शकलो पण आता नाही सोडणार...

आपण कितीही म्हटलं तरी राजकारण, नेते आणि देशाची सद्य परिस्थिती यापासून वेगळे राहू शकत नाही. या system चा भाग होणे, system च्या विरुद्ध उभे राहाणे किंवा इथून पळून जाणे इतकेच option आपल्याकडे आहेत..किंवा system मधे राहून तिचा भाग न होणे आणि कुरकुर करत राहाणे..most of us opt for the last option as long as you in India.

मला खरच कधी कधी वाटतं की या स्वातंत्र्याची आपल्याला किंमतही नाही आणि आपलही लायकी ही नाही. we need a selected freedom, I always feel. Freedom and all so-called rights only for those who pay tax. Bloody why Should I pay for Z security of some gunda wearing a Gandhi topi? सालं कुठेतरी basic मधेच आपण गंडलोत रे..

Ityaadi said...

A very lucid account of the confused generation today. This is what happens when the general education is compromised by focussed knowledge.

Ityaadi

Anand Sarolkar said...

Ek lekh mhanun he changla ahe.
Pan eka kalpanic vyakticha manogat lihinyapeksha...tumcha swatahcha lihila astat tar jast bara vatala asta.

Ranjeet said...

Awesome Post!!!

sangeetagod said...

Very nice post as usual.

mad-z said...

तुझ्या पोस्टकडे पहाण्याचे दोन नजरिये.
एक: फ़ुल्टू कॉमेडी. दारू काय फ़क्त १५ ऑगष्ट नाही तर रोज स्वातंत्र्य देते. बापूनी केलेला असहकार कसा होता ते जाणवून देणारी ती फ़क्त दारूच. मग आम्हाला एकदा चढली की तुम्ही काहिही म्हणा, मारा, बुकला किंवा उलटा घ्या, आम्ही अगदी निपचीत सहन करू. शेवटी तुम्हीच थका!

दोन: स्वातंत्र्यदिन! कोणत्याही देशाच्या किंवा व्यक्तीच्या जिवनातील एक सर्वात सुखाचा क्षण. सावरकरांना विचारा किंवा मग अफ़्रिकेतल्या गुलामांना. पण दुर्दैव असं की आज तोच दिवस आपण ओझ असल्यागत वागतो. मग ते आपल्या जाणतेपणामुळं असेल किंवा मग मेडियाच्या ब्रेन हॅमरिंगमुळे. पण खरच, असंच जर या दिवसाकडं बघायचं असेल तर do we really deserve to be independent. जेंव्हा स्वतंत्र हिंदुस्तानचा एक शिकलेला नागरिक "इससे तो अंग्रेजोंकी गुलामी अच्छी थी!" असं म्हणतो तेंव्हा हसायचं कुणावर - आपल्या सारख्या शिकलेल्या अडाण्यावर, स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राण देणाऱया त्या विरांवर, आपल्या गुलामीची "आवड" असणाऱ्या प्रवृत्तीवर की आपल्या कुजकामी शिक्षणप्रणाली वर? मला तर कधी कधी असं वाटतं की जे NRIs बाहेर जावून बसलेत ना त्यांना जितकं प्रेम हिंदुस्तानबद्दल वाटत असेल, तितकं कदाचीतच एखाद्या देशातल्या बांधवाला वाटत असेल. देश प्रेम पहायचंय तर एखाद्या फ़्रेंच माणसाकडं पहा. मी मधे पोलंडला गेलेलो ... त्या लोकांचं देशप्रेम कसं उफ़ाळून येतं त्याचा प्रत्यय मला पावलोपावली येतो. तसं कधी एखाद्या हिंदुस्तानीला अभिमानानं "मी हिंदुस्तानी" असं म्हणताना नाही ऐकलंय. हो, मी गुजराती, मी गुल्टी, मी मल्लू, मी मराठी ... बऱ्याचदा ऐकलंय. पण हिंदुस्तानी ... छ्छ्या!

असो. म्हणायचं फ़क्त एवढंच. दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे प्रोब्लेम ओगळून पीत रहातात. आणि दुसरे ते जे प्रोब्लेम पिऊन झाला की सोल्यूशनच्या रुपात ओकतात. आपणाला कोणत्या शाळेत जायचंय ते आपणच ठरवायचं.

लोकपरित्राणचं नाव ऐकलंय का कुणी? बहुतेक ती एक सुरूवात असावी आपल्या स्वप्नातला हिंदुस्तान उभा करायची. मग का म्हणून आपण सर्वांनी एकत्र येवू नये आणि काहितरी करावं आपल्या देशासाठी .. आपल्या स्वतंत्र देशासाठी .. जिथं प्रत्येकाला वाटलं पाहिजे ... १९४७ मधलं स्वातंत्र्य तर फ़क्त सुरूवात होती. खरा सत्याग्रह तर आत्ता सुरू होत आहे.

नुसत्या बोलाच्याच शेंगा पेरून काही होत नाही. काहीतरी ऍक्शन आवश्यक आहे. मी काय करतो मला सध्यातरी ठावूक नाही. हो, पण मी नक्की काहितरी करीन हे मात्र मला ठावूक आहे!

Anamika said...

faarach changalya paddhatine mandale ahet tumhi vichar.. vachakanni dilelya comments hi titakyach prerak ahet.

deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर (www.blogadda.com)

Rohit said...

एक हलका फुकला ब्लॉग म्हणूनच वाचला ... पण पुढचे कमेंट बघून जरा भरकटल्या सरखे झाले! ;-) कोहम बाबा ... खरच का रे ईतका विचार केलेलास लिहिताना? सहज वाचून सोडून द्यायचे होते ना?

पण विषय निघालाच आहे तर ... मिही हौस भागवून घेतो ...

रंग दे बसंती आठवतोय ...? "देश को बेहतर बनाना पडता है!" असे अचानक नाही होत काही. की प्रार्थना करून झोपलो आणि सकाळी ऊठलो तर एकदम सगळे चक्चकीत! सिस्टीम म्हणजे काय पेढ्याचा बॉक्स आहे होय? की पेढे खराब आहेत म्हणून सोडून दिले ... घ्या दुसरा बॉक्स आणि ते ही पेढे खराब होईपर्यंत त्याची तारीफ करा ... झाले खराब की वळा तिसरी कडे! त्या बॉक्स मधले एक आपण पण आहोतच की! कोणाची चुक होती यावर खल बऱ्याच जणानी केलाय ... आपणही तेच परत तेच करायचे ... आणि कोणीतरी एखादा दोषी पखडायचा आणि संपवायची चर्चा!! की सिस्टेम भंगी आहे ... किंवा तो पुढारी तुमड्या भरतोय! झाले .. सगळे लागले आपल्या कामाला! हे खरे ईथे सुरू होते ... संपेल कसे? जगातल्या जागा संपून जातील जर असे सगळ्यापासून पळायची सवय पसरू लागली तर!

काही होणार नाही म्हणायचे सोपे असते! पण काय करता येईल हे शोधण्यात दम आहे!

हे सगळे बोलायला ... मी काय केलेय? कदाचीत नसेलही केले काही ... किंवा असेलही ...! तरीही जे म्हणायचेय ते हेच म्हणायचेय ... अगदी हेच! मी काही केल्या न केल्याने याचा अर्थ बदलायचे कारण नाही!

prashant phalle said...

mad-z chya kahi matanshi me sahamat ahe..pan to je bolto ki,जे NRIs बाहेर जावून बसलेत ना त्यांना जितकं प्रेम हिंदुस्तानबद्दल वाटत असेल, तितकं कदाचीतच एखाद्या देशातल्या बांधवाला वाटत असेल" he jara atishayokta vatata. Aso
Ani ek, I am fully agreed with ,मी काय करतो मला सध्यातरी ठावूक नाही. हो, पण मी नक्की काहितरी करीन हे मात्र मला ठावूक आहे!
Me far aashavadi ahe.

Samved said...

aho rao, aata pudha liha ki..