Thursday, June 07, 2007

भाग्यश्री

Internet वर मी World Vision नावच्या एका संस्थेची website बघतोय. ही संस्था गरीब देशातील मुलांसाठी पैसे गोळा करते. "Sponsor a Child" ही त्यांची योजना मला खूपच आवडते. म्हणजे अमुक एक मुलासाठी आपण काही रक्कम देणगी म्हणून द्यायची. पण ते पैसे त्या मुलाला थेट न मिळता, त्याच्या Community च्या भल्यासाठी वापरले जातात. माझ्या मनात एकाएकी परोपकाराची भावना जागृत होते. आणि जोषातच मी कुणातरी बालकाला "sponsor" करण्याचा निर्णय घेतो.

थोडावेळ ती website surf केल्यावर मला असं कळतं की आपण आपल्याला हव्या त्या प्रदेशातील बालक निवडू शकतो देणगी देण्यासाठी. ह्यावर अचानक माझा देशाभिमान जागृत होतो. पैसे द्यायचेच तर निदान भारतातल्या मुलासाठी तरी द्यावेत, असा विचार करून मी अधिक गरजवंत दिसणाऱ्या आफ्रिकन मुलांच्या फोटोंना बाजूला सारतो आणि भारतीय मुलांकडे वळतो.

भारतातील मुलांचे फोटो बघताना, माझ्या असं लक्षात येतं की दक्षिण भारतीय मुलांची संख्या अधिक आहे. मग अचानक माझा भाषाभिमान आणि महाराष्ट्राभिमान जागृत होतो. त्या सुनामीग्रस्त दक्षिण भारतीय मुलांना मी बाजूला सारतो आणि मराठी मुलांचा शोध घ्यायला लागतो. मुलांची भाषा तिथे लिहिलेली नसते, पण शहर मात्र लिहिलेलं असतं. त्यामुळे महाराष्ट्रातलं शहर आणि त्यातल्या त्यात मराठी वाटेल असं नाव असलेल्या बालकासाठी देणगी द्यायचं मी निश्चित करतो.

शोध घेता घेता, एक इटुकल्या पिटुकल्या मुलीचा फोटो माझ्यासमोर येतो. "भाग्यश्री" नाव असतं तिचं. पुण्याची मुलगी आणि नावावरून मराठी वाटतेय आणि काही महिन्यांचीच आहे, एवढ्या भांडवलावर, मी तिला "Sponsor" करण्याचा निर्णय घेतो. तेवढ्यात website च्या तळाला "World Vision is a Christian Organisation" अशी टीप दिसते. अचानक माझा हिंदू धर्माभिमान जागृत होतो. पैसे सरळ वनवासी कल्याण आश्रमाला द्यावेत का असा एक विचार मनात येतो. मनाची चलबिचल होते. पण पुन्हा तो भाग्यश्रीचा हसरा फोटो मला लाइन वर आणतो.

तरीही पैसे भरण्याच्या आधी मी भरलेल्या पैशांवर आयकरातील ८०जी सवलत मिळेल की नाही ह्याची खात्री करून घेतो. आता तर माझा निर्णय अधिकच पक्का होतो. देशाभिमान, भाषाभिमान यांची गोंजारणी, आयकरात सवलत आणि कुणा गरजूला मदत केल्याचं पुण्य, ह्यापेक्षा आणखी काय हवं? मी भराभर माझं नाव, पत्ता, देणगीची रक्कम, भरतो आणि "Sponsor Bhagyashree" वर click करतो. आपण एक अतिशय परोपकारी काम केल्याच्या जाणीवेनं माझा ऊर भरून येतो.

पुढच्याच screen वर पैशाच्या भराण्याबाबत माहिती भरायची असते. ते करता करता माझ्या असं लक्षात येतं की माझं Credit Card वापरून पैसे भरायची सोय ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. थोड्या दिवसांनी प्रयत्न करा, अशी सूचनासुद्धा screen वर येते. तेवढ्यात बायको भजी आणि चहा घेऊन येते. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री, सगळेच चहाच्या कपात विरघळून जातात......

........माझ्या नावाचं जाडजूड पाकीट Letter Box मध्ये पाहून मला आश्चर्यच वाटतं. कुतूहलाने मी ते पाकीट उघडतो. त्यात World Vision ने मला पाठवलेलं आभारप्रदर्शनाचं पत्र असतं, मी भाग्यश्री ला "sponsor" केल्याबद्दल. सोबत तिचा एक छानसा हसरा फोटो. मी चक्रावूनच जातो. पैसे न भरता हे पत्र कसं काय आलं असावं? पुन्हा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती डोकं वर काढायला लगतात. भाग्यश्रीचा हसरा फोटो मनाला टोचणी लावतो. तातडीने मी World Vision ची web site उघडतो. पण आता तिथे sponsor करण्यासाठी तिचा फोटो नसतो.

पत्रातून त्यांचा फोन नंबर समजतो. मी फोन लावतो पण त्यांचं कार्यालय आता बंद झालेलं असतं. आता काय करावं? असा विचार करता करताच मी ती कागदपत्र आणि तिचा फोटो पाकिटात टाकतो. टी. व्ही. वर क्रिकेटचा सामना सुरू होतो. ते पाकीट मी कपाटाच्या एका कोपऱ्यात सरकवतो आणि सचिनची फटकेबाजी बघायला टी. व्ही. समोर बसतो. दुसऱ्याच चेंडूवर सचिन बाद. सचिनला, त्याच्या जाहिरातींना आणि भारतीय संघाला दिलेल्या शिव्यांमध्ये पुन्हा एकदा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री विरून जातात......

...........मी माझा E Mail उघडतो. World Vision कडून मला एक E Mail आलेला असतो. विषय - "Your ID 1047587" मजकूर,

"Its very unfortunate that your sponsor child, Bhagyashree had high fever and fell sick. Failing to recover from her sickness, the girl passed away last week"

माझ्या मेंदूला झिणझिण्या येतात. डोळ्यासमोर भाग्यश्रीचा चेहरा येतो. डोळ्याच्या कडा क्षणभर पाणावतात. फोन खणखणतो. पालीकडून मित्र मला "फुटबॉल खेळायला येतोस का?" म्हणून विचारतो. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती हे सगळे, फुटबॉल ला मारलेल्या लाँग किक सारखे दूरवर जाऊन पडतात.

पण भाग्यश्री मात्र कपाटात ठेवलेल्या त्या पाकिटातील फोटोमधून माझ्याकडे बघून हसत असते. तशीच. कायमची.

15 comments:

Anand Sarolkar said...

Manala chatka lavun jaanara anubhav ahe ha!

Prasad said...

Nice post...Actually every single article is readable on this blog..keep writing

Monsieur K said...

life is strange indeed!
you decide to perform a noble task - the motive behind doing it could be anything - and the end result may not exactly turn out the one you expected.

Vidya Bhutkar said...

That was something.... Its good that I havent seen the photo of the child. It would have been tough to forget it. But as you have very well written, life moves on so do we. Sometimes, we feel guilty about it, but then this is the way it is. :-(
Btw, this post was little similar to "रोहिंग्या आणि डान्सिंग विथ द स्टार्स... " :-) Just a thought...

-Vidya.

Ranjeet said...

Khupach touching post aahe - Kadu Satya - Je kadhi kadhi aaplyala aaplich laaj vatave ase aste nahi ka? Hypocricy rules the world that humans live in. (Pan ase mhanun aapla gunha / selfishness kami hoto ka?)

Meghana Bhuskute said...

सरळ, स्वच्छ आणि निर्दय.

Samved said...

बाप रे. वाचून कसंसच झालं. हे म्हणजे जसं हमखास जीएंच्या कथेत होतं तसं झालं. झाडावरुन पिल्लू पडलं की खाली कधीच पालापाचोळा नसतो, असतो तो एखादा अशाळभूत बोका किंवा टोकदार दगड

Anonymous said...

manaat rutoon basalee hee goshT....

स्नेहल said...
This comment has been removed by the author.
स्नेहल said...

durdaivee aahe kharach.... bhaagyashree naahee..tuzya mazyasarakhe lok...jyana madat karayachi aahe itakach kalat pan kuthe, kadhi, kashi karavi he umagat nahi

Anonymous said...

अगदी असंच होतं...कधी नव्हे ती परोपकाराची भावना जरा कुठे मनात डोकावत असते..पण लागलीच बाकी अडथळे पिंगा घालत घालवून देतात तिला...

चैतन्य देशपांडे said...

रात्रीचे बारा वाजले आहेत्. माझ्या मेंदूला झिणझिण्या आणणारा हा प्रसंग़ अनेक दिवसांनी वाचला!

दोन ओळी आठवल्या...

"कोमेजतांना फुलं ठेवतात कळ्यांसाठी जागा
काट्यांनो, तुम्हीसुद्धा फुलांसारखं वागा!"

निल्या said...

टची. अगदी मनाचा छेद घेणारी गोष्ट.
पण आपल्याल जर काही मदत करायची इच्छा असल्यास. आपण जिथे राहता त्या देशात आशा फॉर एज्युकेशन चा चाप्टर अस्तित्त्वात आहे का ते पहा. नसेल तरीही तुम्ही कोणताही चॅप्टर निवडून तेथे डोनेट करु शकता!
(आशा बद्दल तुम्हाला माहिती असेलही पण तरी पण सांगतो,आशा ही संस्था भारतातील मुलांच्या सिक्षणासाठी कार्य करते. एखाद्या मुलाला तुम्ही स्पॉन्सर करु शकता.आशाचे जगभर चाप्टर्स आहेत.)
संकेत स्थळ:
www.ashanet.org
You can donate here with a creid card!

Shardul said...

kahich na bolalela bara na ???

Anonymous said...

Kuldip D Gandhi :-
Chhhan Lihilaay, Thhode Ajun Finishing hawe hotey, But Still U Rocked. :)