"कोहम चा शोध घेत रहायचं. हा शोध घेताना, जगाच्या प्रयोगशाळेत आयुष्याचे प्रयोग करत रहायचे, आणि निरिक्षणं ह्या ब्लॉगमध्ये नोंदवायची. फारफारतंर अनुमान नोंदवायचं. निष्कर्श मात्र काढायचे नाहीत. कुणी वाचंलाच हा ब्लॊग, तर त्यांचा निष्कर्श काढायला ते मोकळे असतील......."
ह्या मिशन स्टेटमेंट ने बरोबर एक वर्षापुर्वी हा ब्लॉग सुरू केला.
ह्या मिशन स्टेटमेंटला मी किती जागलो माहित नाही.
दर आठवड्याला लिहायचंच असं म्हणून सुरू केलेला हा प्रयत्न. हळूहळू आठवड्याचे दोन झाले आणि सध्या गाडी तीनवर अडकलेय. पण चालू आहे, थांबली नाही.
एक मी होतो. कधीकधी लिहायचो. लिहिता येईल असं वाटायचं. पण चांगलं लिहू अशी खात्री नव्हती. आळस होता, कंटाळा होता. थोडी भीतीही होती. मग त्या "मी" ने लिहायची जबाबदारी "त्या"च्यावर टाकली आणि त्याच्या नावाचा ब्लॉग सुरू केला. लिहिलेलं वाईट उतरलं तर त्याच्या नावावर. पण चांगलं उतरलं तर?
अर्थात मी कधी लपून नव्हताच. ब्लॉग त्याच्या नावावर असला तरी कमेंट्स बघायला मी पुढे. सुरवातीला एक-दोनही समाधान द्यायच्या. हळूहळू आकडा वाढत गेला. कोणीच वाचत नव्हतं तोपर्यंत काहीही लिहिलेलं चालणार होतं. जास्त लोकं वाचायला लागले आणि मग थोडा ताण यायला लागला. अर्थात "त्या"ला. म्हणूनच तर त्याच्या नावचा ब्लॉग.
अपेक्षांचं ओझं वाटायला लागलं. लिहावं ते स्वानंदासाठी असं म्हणण्याचे दिवस गेले. लिहावं ते अधिकाधिक कमेंट्स मिळवण्यासाठी. म्हणजे जाहीरपणे मी काही हे स्वीकारणार नाही पण आपलं खाजगीत म्हणून सांगतोय.
स्पर्धा, असूया निर्माण व्हायला लागली. नकळतच (मी नव्हे) तो इतरांचे ब्लॉग्स बघताना पहिल्या कमेंट्स किती हे पाहायला लागला. तूलना करायला लागला. मला एवढ्याच, त्याला इतक्या का? तिला इतक्या का? असं काय छान लिहिलंय त्यांनी?
मग काही ट्रिक्स कळायला लागल्या. एक कमेंट दो. एक कमेंट लो. त्याने तेही करून पाहिलं.
पुढे ते व्यसनही कमी झालं. पण नंबर्सची अपरिहार्यता काही कमी झाली नाही. बहुदा होणारही नाही.
पण एक नियम मात्र पाळला. आवडलेल्या लिखाणाला मनापासून दाद दिली मग ती सदतिसावी असो नाहीतर पहिली. न चुकता. कितीही असूया वाटली तरीही. अर्थात त्याने.
काय आहे? कधीकधी रुढींच्या झुली न पांघरता मन मोकळं करावंसं वाटतंच. कधी कधी खरं बोलावसं वाटतंच. आज बोललो. आपण केलेल्या गोष्टींची बिलं दुसऱ्यांच्या नावावर तरी किती फाडायची? कुठेतरी स्वतः बील भरलं पाहिजेच की. आता हे सगळं खाजगीत म्हणून बरका? कुठे बोलू नका
मधुनच कधी माझा पहिला पोस्ट बघतो. वाटतं की खरोखरच आपण आपल्या मिशन स्टेटमेंटला जागतोय का? माहीत नाही. माहीत नाही असं म्हणायचं कारण खरं उत्तर तितकसं आनंददायी नाही.
वाटतं थांबावं. जोपर्यंत पुन्हा स्वानंदासाठी लिहू शकत नाही तोपर्यंत थांबावं. But what about numbers' obsession? स्वतःचा अहं पोसायची सवय सोडायची?
कळतं पण वळत नाही.
Happy Birth Day Koham......
Tuesday, September 25, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
16 comments:
Good analysis :). Happy b'day. Lihit raha, Nilesh. Pudheel anek varshansathi hardik shubhechchhaa.
lihit raha... shubhecchaa.
Congratulations!
Keep it up!
बाजारही आवडला.
-Prashant
कमेन्ट्सचं ऑब्सेशन आणि दडपण ह्या दोन्हींमधून बाहेर पडून (पुन्हा एकदा) फ़क्त स्वत्:साठी लिहीण्याची सुरुवात करणे अवघड पण जरुरीचे असतेच. स्वत्:ला काय वाटतेय ते मनात उतरण्या आधीच जेव्हा ते कोणत्या शब्दात मांडायचे हा विचार सुरु होतो तेव्हाच ऑडियन्स साठी पर्फ़ॉर्मन्स सुरु झालेला असतो. आपणच आपल्याला परत भेटण्यासाठी खूप प्रयास करावे लागतात. फक्त तो करणे आवश्यक आहे हे स्वत्:ला पटायला पाहीजे आधी. मग प्रयत्न थोडे सोपे होतात.
आणि मग त्यानंतरचं लिहिणे परत सुरुवातीच्या पावलं अडखळण्याच्या प्रक्रियेतून जायला लागते. आता जास्तच कठीण वाटत पाऊल उचलणं. पण मग अशावेळीच ज्या कमेन्ट्सचे दडपण, अडथळा वाटायला लागलेला असतो त्यांच्यापैकीच एखाद्या कमेन्ट्सचा आश्वासक आधार मिळतो.
तुझं लिहिणं प्रत्येक पोस्ट नंतर जास्तं जास्तं खुलत चाललय. पण तरीही प्रत्येक पोस्ट आधीच्या पोस्ट पेक्षा / इतकचं चांगल व्हायला पाहिजे असा कोणताही अट्टाहास न बाळगता लिहिण्यासाठी तुला शुभेच्छा!!
आधी अभिनंदन!!
अरे commentsचं कसलं दडपण, गेल्या भोकात. मला वाटतं एका वयानंतर तुम्ही कुणाच समोर उघडे नाही होऊ शकत, वेगवेगळी कारणं असतात. तेव्हा blog हाच उत्तम मार्ग. कोण म्हणतं मराठी मरत चालली? इथे येऊन बघा म्हणा..
Happy Birthday Nilesh... Liheet Rahaa.. :)
Pudheel Lekhanasathee Shubhechchha.
Happy Birth day Koham.
Regarding comments:
There is nothing wrong in wanting to have more comments because after all we are trying to communicate.
Most people (myself included) comment when they like some thing.
I guess we all need to mature and start practising and welcoming criticism
Nilesh,
Congratulations on your blog's first b'day :)
liked your analysis on comments - each one of us will be lying if we say that we dont like them, or we want more of them; as more & more ppl read your blog, the pressure does get on to you; but after a certain point in time, its necessary that you enjoy writing/blogging rather than worrying about how ppl will react n how many comments you will get - tyaat ch khari majaa aahe :)
all the best for the future!
~ketan
chhaan lihilay...
comments chya stats madhye adaku nakos.... ani lihit raha
~Snehal
koham, agadi pratyek blogger chya manatala lihila ahes.. :) lihit raha.. chan philosophical touch asato tuzhya likhanala..
HAPPY BIRTHDAY!
I read your post as soon as you wrote in and then I started going through your old posts to mention the ones I liked most. :-) But as I went into details, I realised that I liked most of them :-) and I liked them very much.You write really well, keep writing.
-Vidya.
Happy Birthday! Keep it up!
Khajgit mhanun wish kartoy ;-)
Hi Nilesh,
Busy again? Tula Nandan chya 'Je Je Uttam..' sathis tag kelay majhya post var...Tujha avadata utara vachnysathi utsuk aahe aata. :-)
-Vidya.
Happy Birthday!!! "tula" ani "tyala" doghanna pan...
To comments sathi lihit asel pan tu swatah sathi lihi...
lihit raha!!!
Nilesh,
Please visit my blog, I have tagged you for 'Avadatya pustakatale utare'.
www.anukulkarni.blogspot.com
-Anu
Post a Comment